Plastic Mulching Paper Subsidy: अर्ज कसा करायचा?
- प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- महाडीबीटीच्या अधिकृत लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- त्यानंतर तुम्ही नोंदणी करताना दिलेला यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- Horticulture पर्यायासमोरील Select Items बटणावर क्लिक करा आणि प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा पर्याय शोधा आणि निवडा.
- त्यानंतर तुम्हाला जेथे मल्चिंग करायचे आहे ते क्षेत्र टाका आणि save application या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्यापैकी प्राधान्य निवडा आणि शेवटी पसंती क्रमांक देऊन अर्ज सबमिट करा.
- जर तुम्ही या घटकांतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे ऑनलाइन भरावे लागतील.
- या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता आणि या योजनेअंतर्गत 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळवू शकता.
- प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान दिले जाते?
प्लॅस्टिक मल्चिंग पेपर सबसिडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते, ज्याची कमाल मर्यादा 16 हजार रुपये आहे.