भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर चार सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहेत. त्यापैकी आपणास एक चक्र पूर्ण दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व आणि दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूस अश्याच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.