कस सांगावं , कुणा सांगावं, काही कळत नाही
जीवन कस जगावं हेच समजत नाही ..
कुठे थांबावं , कधी थांबावं , काही कळत नाही
धावपळीच्या काळात हेच समजत नाही ..
काय पेरावं , काय उगवावं , काही कळत नाही
निसर्गाच्या कालचक्रात हेच समजत नाही ..
किती कमवाव ,किती खर्चाव , काही कळत नाही
महागाईच्या लाटेमध्ये हेच समजत नाही ..
काय खावं, काय नाही , काही कळत नाही
फास्टफूड च्या सवयीमुळे हेच समजत नाही ..
कुणाशी बोलावं, किती बोलावं ,काही कळत नाही
मोबाईलच्या अति वापराने हेच समजत नाही ..
कधी हसावं, कधी रडावं , काही कळत नाही
आयुष्याच्या वाटेमध्ये हेच समजत नाही ..
प्रा. मयूर एकनाथ इंगळे
दिनांक :-३ नोव्हेबंर २०२०

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.