निर्जीवात जीव गुंतवून माणसा,

सजीवासी जीव लावाया मात्र तू विसरलास .. मोबाईल च्या अति वापर करून,

 मनमोकळा संवाद मात्र तू विसरलास..व्हाट्सएप-फेसबुक वर स्टेटस लावून,

समोर स्तुती करायला मात्र तू विसरलास ..कार-घर कर्जाचे हप्ते भरण्यामागे ,

सुखाचे दोन घास  मात्र तू विसरलास..चार भीतींच्या सुशोभीकरणा मध्ये,

शांत झोप घेण्या मात्र तू विसरलास..ब्रॅण्डेड वस्तुंच्या मागे लागून लागून,

संस्कृतीचा ब्रँड जपण्यास मात्र तू विसरलास,मुलांची लाखो रुपये फी भरण्यामागे,

मुलांना संस्कार देण्या मात्र तू विसरलास..फास्टफूड च्या आहारी जाऊन ,

स्वतःची काळजी घेण्या मात्र तू विसरलास..रोबोटला चालणे बोलणे शिकवून,

स्वतः सजीव आहे हे मात्र तू विसरलास..श्रीमंत होण्याच्या या स्पर्धेमध्ये धावून,

माणुसकीची श्रीमंती मात्र तू विसरलास ..निर्जीवात जीव गुंतवून माणसा,

सजीवासी जीव लावाया मात्र तू विसरलास ..© मयूर एकनाथ इंगळे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.