आय पी ओ चे पूर्ण नाव इनिशिअल पब्लिक ऑफेरींग होय .
जेव्हा एखादी कंपनी विस्तार वाढविण्यासाठी किंवा भांडवल वाढविण्यासाठी कर्ज न घेता काही भाग भांडवल विक्रीस काढतात . आणि या कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होतात .शेअर मार्केट मध्ये लिस्ट होण्यासाठी कंपनीला सेबी कडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी कंपनीला सर्व माहिती सार्वजनिक करावी लागते जसे कि नफा, तोटा, भांडवल, कर, सेवा इ.

जेव्हा कंपनी त्यांचे काही समभाग सामान्य गुंतवणूक दारांसाठी विक्रीस काढते आणि सामान्य गुंतवणूकदार हे समभाग कंपनीकडून विकत घेतो . हि सर्व प्रक्रिया लॉटरी पद्धतीने होते. या प्रक्रियेला इनिशिअल पब्लिक ऑफेरींग म्हणजेच आयपीओ असे म्हणतात .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.