या २१ साव्या शतकात सर्व जण स्पर्धेत सहभागी झाला आहे .ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि ही स्पर्धा सर्व क्षेत्रात सुरू झाली आहे

या २१साव्या शतकातील स्पर्धेत तुम्हाला टिकायचे असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय , क्लासेस, रेस्टॉरंट, हॉटेल , मेडिकल, किराणा दुकान, पाणीपुरी सेंटर, भेळपुरी सेंटर, सलून, भाजीपाला केंद्र, इ केंद्र, किचन ट्रॉली व्यवसाय, दूध व्यवसाय, बांधकाम व्यवसाय असे अनेक व्यवसाय किंवा स्वतःचे कलागुणांना वाव देत असाल जसे की संगीत, पेंटिंग, कॅरीकेचर, नृत्य ,वादन, कविता असे सर्व प्रकारच्या गोष्टि मधून जर आपण ऑनलाईन पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर स्वतःचे फेसबुक पेज असणे खूप गरजेचे आहे

फेसबुक पेज बनविणे खूप सोपे आहे

तुम्ही स्वतः घरी बसून तुमचे फेसबुक पेज तयार करू शकतात

चला तर मग बघूया की फेसबुक पेज कसे बनवावे

१) यासाठी तुमचे स्वतःचे फेसबुक अकाउंट असणे गरजेचे आहे

२) फेसबुक अकाउंट नसेल तर ते अकाउंट तयार करून घ्या

३)फेसबुक अकाऊंट ला लॉगीन करा

४)(login) लॉगीन केल्यानंतर (page)पेज या ऑप्शन वर सिलेक्ट करा

५) इथे (create) क्रियेट हा पर्याय निवडा

६)तुमच्या व्यवसाय निगडित योग्य नाव जे ग्राहकांना आकर्षित करेल असे नाव फेसबुक पेज ला द्या

७)हे पेज चे नाव इथे टाका

६) आता येथे खूप पर्याय येतील यातला तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा

उदा. business page, community, personal blog,health, shopping, supermarket etc

७)यापैकी एक पर्याय समजा आपण (business)बीसीनेस निवडला तर यात अजून खूप पर्याय येतात तर तुमचा व्यवसाय ज्या क्षेत्राशी निगडित असेल ते क्षेत्र निवडा

८) तुमचा पत्ता (adress) इथे टाका जेणेकरून लोकांना माहिती पडेल की तुमचा व्यवसाय कुठे आहे

९)एक तुमच्या फेसबुक पेजसाठी आकर्षक प्रोफाइल पिक्चर आणि कव्हर फोटो निवडा जो व्यवसायाशी निगडित असेल

१०)आता तुमचे फेसबुक पेज तयार झाले आहे

११) यात संपूर्ण माहिती भरा जसे की फोन नंबर, ई-मेल ,वेबसाईट असेल तर वेबसाईट ची लिंक, डिस्क्रिप्शन मध्ये व्यवसायाविषयी थोडक्यात ग्राहकांना आकर्षित करतील अशी माहिती,लोकेशन, व्यवसाया सुरू राहण्याची वेळ इत्यादी

१२) आता तुम्ही तुमची पहिली पोस्ट तुमच्या स्वताच्या पेज वर टाकू शकतात

१३) तुमचे पेज जास्तीत जास्त लोकांनी बघावे म्हणून सर्वात आधी आपल्या मित्रांना पेज लाईक करण्यासाठी आमंत्रित करा

१४) जर तुम्हाला खुप जास्त लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर तुम्ही ऍड (add)या सेक्शनमध्ये जाऊन पैसे भरून तुमच्या व्यवसायाची जाहिरात सुद्धा करू शकतात

वरील लेख आवडला असल्यास आपला अभिप्राय किंवा अजून कुठल्या विषया संदर्भात माहिती हवी असल्यास कंमेंट (comment)मध्ये कळवा

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

One thought on “स्वतःचे फेसबुक पेज कसे बनवावे?”

Leave a Reply

Your email address will not be published.