इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट्स, ट्रान्समीटर, रिसीव्हर, इंटिग्रेटेड सर्किट्स (आयसी) सारख्या संप्रेषणाची साधने हाताळणे व त्याचा उपयोग कसा करावा हे शिकायला मिळते

हे मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स, एनालॉग आणि डिजिटल ट्रान्समिशन आणि डेटा, आवाज आणि चित्रीकरणाचे देवाण -घेवाण म्हणजेच ट्रान्समिशन आणि रिसेप्शन (उदाहरणार्थ एएम, एफएम, डीटीएच), मायक्रोप्रोसेसर, उपग्रह संप्रेषण, मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, अँटिना आणि वेव्ह प्रगतीसह अश्या खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते

रेडिओ फ्रीक्वेनसी वर आधारित सर्व विषयांची माहिती या क्षेत्रात मिळते

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध अनुप्रयोगांचे विश्लेषण, सिस्टम अंमलबजावणी, ऑपरेशन, उत्पादन आणि देखभाल या मूलभूत संकल्पना आणि सिद्धांतांवरील विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढविणे हे त्यांचे लक्ष्य आहे.

या क्षेत्रात सॉफ्टवेअर शी निगडित काही विषय यात समाविष्ट असल्याने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीला गरजेचे असणारे प्रोग्रामिंग चे ज्ञान ही यात मिळते

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंता काय करतात

आपले जीवनात टेलिव्हिजन, रेडिओ, संगणक, मोबाईल इत्यादीसारखे सुलभ आणि आनंददायक ,आल्हाददायक बनविणारे सर्व अनुप्रयोग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंता यांनी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले आहेत.

यामुळे लोकांना घरी बसून जीवनात खूप आनंद अनुभवता येतो

  • दूरदर्शन व ग्रामीण भागात टीव्ही, टेलिफोन व इंटरनेट सेवा आणणार्‍या उपग्रहांची रचना व देखभाल करण्याचे काम हा अभियंता करीत असतो

हे अभियंते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या प्रगत संप्रेषण सुविधा देखील तयार करतात जे जगभरातील लोकांना एकत्र आणतात

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअर्ससाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत

कारण ते भारतीय टेलिफोन इंडस्ट्रीज, नागरी उड्डयन, विविध राज्यांमधील विकास केंद्रे, संरक्षण, एनपीएल, आकाशवाणी, टपाल व तार विभाग, रेल्वे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डीआरडीओ अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.

दूरसंचार, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / आयटी, उर्जा क्षेत्र, हार्डवेअर उत्पादन, गृह उपकरणे आणि व्हीएलएसआय डिझाइन, दूरदर्शन उद्योग आणि संशोधन आणि विकास या क्षेत्रावर या अभियंत्यांची पकड असते यामुळे याक्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत

हे अभियंते GATE ची परीक्षा पास होऊन उत्तम अश्या सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनी मध्ये महत्त्वाचे पदांवर कार्य करू शकतात

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डाटा सायन्स , डाटा ऍनालिसिस, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पॉवर , वायरलेस कंमुनिकेशन अश्या विविध क्षेत्रात आपले करियर करू शकतात

सायबर सिक्युरिटी ,नेटवर्क डीझायनर , आर एफ (RF) अभियंता म्हणून हे अभियंते कार्य करू शकतात

आताच्या काळातील मोबाईल ,टॅब, लॅपटॉप, तसेच सर्व गृहउपकरेणे इंटरनेट शी जोडण्याचे आणि वायरलेस बनविण्यासाठी हे अभियंते प्रयत्नशील असतात

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

One thought on “इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विषयी थोडक्यात माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published.