जंगलात प्राण्याची मीटिंग भरली

सिंहाची निवड बिनविरोध झालीजंगलात निघाली सिंहाची स्वारी

बघायला जमली गर्दीच न्यारीसोंड हलवत उभा अगडबंब हत्ती

कोल्हा शोधत होता नवीन युक्तीजीराफने स्वागत केले हलवून मान

माकडाने सजवून ठेवले सारे रानवाघाने फोडली मोठी डरकाळी

उंटाने ठेवली पंगत सायंकाळीअस्वलाने बनवलं जेवण भारी

 सशाने मेहनत  घेतली खरीकासवाने वाढले जेवण सर्वाना

हसायचा कुणाला नव्हता परवानाशांत पंगतीत गेंड्याला आले हसू

झेब्रा म्हणाला आपण शांतच बसूआटोपून जेवण गेले जंगलात सर्व

लांडग्याच्या मात्र काही जाईना गर्वजंगलाचा पुन्हा सिंहच होता राजा

भीतीने सर्वांचा वाजला होता वाजा

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

130 thoughts on “जंगलाची निवडणूक”

Leave a Reply

Your email address will not be published.