कविता म्हणजे  वादळ

कविता म्हणजे  गोंधळ

कविता म्हणजे  विचार

कविता म्हणजे  प्रकार

कविता म्हणजे  राग

कविता म्हणजे आग

कविता म्हणजे आनंद

कविता म्हणजे  छंद

कविता म्हणजे  चाहूल

कविता म्हणजे  पाऊल

कविता म्हणजे  अविष्कार

कविता म्हणजे साक्षात्कार

कविता म्हणजे सुख

कविता म्हणजे  दुःख

कविता म्हणजे  सदाचार

कविता म्हणजे आचार

कविता म्हणजे  मित्र

कविता म्हणजे चित्रं

कविता म्हणजे शब्द

कविता म्हणजे मुग्ध

कविता म्हणजे कल्पना

कविता म्हणजे  संकल्पना

कविता म्हणजे रचना

कविता म्हणजे आलोचना

कविता म्हणजे  भीती

कविता म्हणजे नीती

कविता म्हणजे क्रोध

कविता म्हणजे  विरोध

कविता म्हणजे प्रेम

कविता म्हणजे  संभ्रम

कविता म्हणजे  ज्ञान

कविता म्हणजे विज्ञान

कविता म्हणजे माया

कविता म्हणजे काया

कविता म्हणजे मोह

कविता म्हणजे विद्रोह

कविता म्हणजे रंग

कविता म्हणजे भंग

कविता म्हणजे भावना

कविता म्हणजे कामना

कविता म्हणजे  दया

कविता म्हणजे हया

कविता म्हणजे करुणा

कविता म्हणजे यातना

कविता म्हणजे जीव

कविता म्हणजे कीव

कविता म्हणजे आठवण

कविता म्हणजे साठवण

कविता म्हणजे मानसिकता

कविता म्हणजे उदासीनता

कविता म्हणजे सत्य

कविता म्हणजे असत्य

कविता म्हणजे धर्म

कविता म्हणजे मर्म

कविता म्हणजे उपदेश

कविता म्हणजे संदेश

कविता म्हणजे बोध

कविता म्हणजे शोध

कविता म्हणजे स्तुती

कविता म्हणजे मनस्थिती

कविता म्हणजे आचरण

कविता म्हणजे व्याकरण

कविता म्हणजे धैर्य

कविता म्हणजे शौर्य

कविता म्हणजे साद

कविता म्हणजे प्रतिसाद

कविता म्हणजे श्वास

कविता म्हणजे विश्वास

कविता म्हणजे मन

कविता म्हणजे धन

कविता म्हणजे क्षमा

कविता म्हणजे महिमा

कविता म्हणजे एकांतवास

कविता म्हणजे सहवास

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

136 thoughts on “कविता म्हणजे..”

Leave a Reply

Your email address will not be published.