अंगणात उडतंय रंगीत फुलपाखरू
बाळाला जेवायला आज काय करू

आईने बनवलाय वरणभात
बाळ म्हणत मी नाय खात

खिडकीत बघ आलीय खारु
चल ना रे बाळा जेवण करू

झाडावर बसलीय छोटीशी चिऊ
वरणभात झालाय छान छान मऊ

हंबा खातो चारा हिरवागार
बाळाचे जेवण स्वादिष्ट फार

फिरत फिरत आलाय मोठा हत्ती
जेवण करून घे मग येईल शक्ती

मिठू मिठू करतोय बघ पोपट
एक घास खाऊन टाक पटापट

माकड करतय कसं हुप हुप
वरण-भातावर टाकलय तूप

कावळा करतोय काव काव
एक घास फक्त जिभेला लाव

मांजर ने पकडलं उंदीर च बोटं
बाळाच्या माझ्या भरलाय पोट

गाडी चा हॉर्न वाजतोय पम पम
पिऊन घे पटकन आता मम मम्

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.